दोन दिवसात लावला पैठण पोलिसांनी छडा

पैठण । नंदकिशोर मगरे 

प्रेमासाठी वाट्टेल ते आपण ऐकत आलो आहोत. मात्र भावाच्या बायोकोवरच्या प्रेमासाठी चक्क भावाचा खुन करणारी व नात्याला काळींबा फासणारी दुर्देवी घटना पैठण शहरात उघडकीस आल्याने पैठण शहरासह तालुक्यात या घटनेने  सामान्य नागरिकात सख्खा भाऊ पक्का वैरी ! या बाबीची प्रचिती देत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ,  दोन दिवसापुर्वी शहरातील पाचपिंपळ परिसरात शिवाजी विठ्ठल लोखंडे 40 या तरूणाचा गळा चिरून निर्दयीपणे खुन केल्याची घटना उघडकीस आल्याने लॉकडाऊनच्या काळात शहरात कमालीची दहशत निर्माण झाली होती त्यावरून पैठण पोलिसात आज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र औरंगाबाद ग्रामीणच्या पो अ मोक्षदा पाटील यांनी घटनेचं गांभिर्य लक्षात घेता  सपोअ गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे भागवत फुंदे  व स्थानिक पोलिस निरिक्षक भगिरथ देशमुख  असे  पथक तैनात करून तपासाची गती वाढवली असता शिवाजीचा लहान भाऊ गोरख लोखंडे 36  रा राहता जि अहमदनगर याच्या दिशेने तपासाची चक्र फिरवली असता गोरख हाच आरोपी असल्याचा संशय बळावला असल्याने त्याची कसून चौकशी केली असता अखेर पोलिसांना गोरख हाच शिवाजीचा मारेकरी असल्याचे समजताच त्याला तात्काळ ताब्यात घेवून पैठण पोलिसात पाचारण करण्यात आले         अधिकची  चौकशी केली असता व खाकीचा धाक दाखवताच आरोपी गोरख यांनी खुन केल्याची कबूली देत पोपटा सारखी आप बिती सांगितली .मयत शिवाजी लोखंडे याच्या पत्नी सोबत माझे प्रेम संबध होते मात्र माझा भाऊ शिवाजी लोखंडे हा आमच्या प्रेमात अडचन निर्मान करत असल्यानेच मीच दि 17 रोजी रात्री त्याच्या घरी जावून शिवाजी झोपेत असतांना त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली असल्याची कबूली गोरखने दिली असून गोरख लोखंडे यांच्या विरोधात पैठण पोलिसात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपपोनि सचिन सानप हे करित आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.