बीड: तालुक्यातील बोरखेड येथील दिपक मुरलीधर हवाले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.दिपक मुरलीधर हवाले (वय 35) हे गेल्या वर्षभरापासून आजारी होते. बुधवार (दि.15) रोजी दुपारी त्यांची अचानक प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री 8 वाजता शोकाकुल वतावरणात व मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दिपक हवाले यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमी वयात दिपकच्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
Leave a comment