जालना । वार्ताहर
कोरोना या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद,जिल्हा प्रशासन यांच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे राज्य व केंद्र शासनाने संचारबंदी, लॉकडाऊन आदेश काढून जनतेला घरीच थोपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. जिल्हा पोलीस प्रशासनाने देखील याबाबत वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु काही लीक यासर्व आदेशाचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सदर बाजार,कदीम जालना,शहर वाहतूक शाखा यांच्या वतीने लॉक डाऊन तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जालना यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले गेले आहे.
दुसरीकडे जालना नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या मार्गदर्शना खाली तोंडाला मास्कचा वापर न करणार्या व्यक्ती विरुध्द जोरदार मोहिम हाती घेण्यात आली आहे. मास्कचा वापर न करता रस्त्यावर बिनधास्त वावरणार्या व्यक्तींविरुद्ध जालना नगर पालिकेतर्ङ्गे आता दंडात्मक कारवाई केली जात असल्यामुळे रस्त्यावर विनाकारण ङ्गिरणार्या लोकांची वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे जालना नगर परिषद कार्यालयातर्ङ्गे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजना आणि या उपाययोजनांची अमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अधिकारी , कर्मचारी घेत असलेले प्रामाणिक प्रयत्न आणि जनतेकडून मिळत असलेले सहकार्य यामुळेच जालना शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी मदत झाली असे नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल यांनी सांगितले.लॉकडाऊन आदेशाचे पालन करून जनतेने नगर परिषद व जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.गोरंटयाल यांनी केले आहे.
Leave a comment