संशयास्पद मद्यविक्री असणार्या एकूण 8 अनुज्ञप्त्या निलंबित
जालना । वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्ङ्गत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण 60 गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यात 26 वारस व 34 बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले असून 24 आरोपी अटक करण्यात आले असून ज्यात हातभट्टी 698 ल. रसायन 12320 लि.देशी 106.26 ब.लि. असुन 9 वाहने जप्त करण्यात आले आहेत. ज्यात 1 चारचाकी, 1 तीन चाकी व 7 दुचाकी वाहने यांचा समावेश असुन 10 लाख 54 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी दिली आहे. संशयित व्यवहार असणार्या व चोरून मद्य विक्री करणा-या आरोपींच्या सांगण्यानुसार व अवैध मद्यसाठा करणार्या अशा संशयित अनुज्ञप्ती विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्ङ्गत मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत अनुज्ञप्ती निरीक्षण वेळी जालना जिल्ह्यातील एकूण 8 अनुज्ञप्तीवर (5 परवाना कक्ष हॉटेल सपना, एङ्गएल-3 क्र 259, नेर, हॉटेल सिध्दांत, एङ्गएल-3 क्र 187, माहोरा रोड, जाङ्ग्राबाद, हॉटेल रविराज, एङ्गएल.-3, क्रं 170, सुखापुरी, हॉटेल चंद्रलोक एङ्गएल -3 क्र 25 नुतन वसाहत,हॉटेल बजाज,एङ्गएल -3 क्र 222 घनसावंगी, हॉटेल मधुबन, एङ्गएल-3 क्रं 73, घनसावंगी व देशी दारु विक्री श्रीमती सी. आर. खंडेलवाल, सीएल-3 क्र. 43, खासगाव ता. जाङ्ग्राबाद. जैस्वाल अँड सिनकर सीएल-3 अनुज्ञप्ती क्र. 87, वालसावंगी अनुज्ञप्तीवर) कारवाई करण्यात आली. तसेच हॉटेल चंद्रलोक एङ्गएल-3 क्र. 25 नुतन वसाहत आणि एस.जी. जैस्वाल अँड सिनकर सीएल-3 या अनुज्ञप्तीवर अवैध चोरीबाबत पोलीस विभागाने केस केलेली असून या विभागाच्या मोहिमेत देखील दोन्ही अनुज्ञप्तीबाबत विसंगती प्रकरण नोंदविण्यात आले आहेत. तसेच हॉटेल बजाज, एङ्गएल-3 क्र. 222 घनसावंगी, हॉटेल मधुबन एङ्गएल-3 क्र. 73 घनसावंगी या दोन अनुज्ञप्तीधारकांनी लॉक उघडुन दिले नाही त्यांनी निरीक्षण कामात असर्मथता दर्शविल्यामुळे लॉकडाऊन संपल्यावर दोन्ही अनुज्ञप्ती सुरु करण्यापुर्वी अनुज्ञप्तीचे मद्यासाठा बाबत पुन्हा तपासणी करुन कठोर करावाई प्रस्तावित करण्यात येईल. सर्व अनुज्ञप्तीवर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये जिल्हाधिकारी जालना यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरील 8 अनुज्ञप्त्या ह्या पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आलेल्या आहेत अबकारी अनुज्ञप्तीवरील व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश काळात अवैध दारु वाहतुक रोखण्यासाठी अवैध धंद्याविरुध्द रामनगर साखरकारखाना, राहुन नगर मंठा चौङ्गुली, चंदनझिरा, मंगळ बाजार, गांधी नगर कडेगाव, घोन्सी तांडा, बदनापुर बाजार वाहेगाव, शेलगाव, सोयगाव देवी ङ्गाटा, बंरजळा ङ्गाटा, लिंगेवाडी ङ्गाटा, वालसा भोकरदन या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे.
Leave a comment