बिबट्याच्या हल्ल्यात गायब झालेला तरुण शेतकरी मृत अवस्थेत सापडला; आष्टीत खळबळ
आष्टी : वार्ताहर
आष्टी तालुक्यातील बावी गावात एक भीषण घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात सापडलेला गावातील तरुण शेतकरी राजेंद्र विश्वनाथ गोल्हार वय (36)मृत अवस्थेत सापडल्याने गावात शोकाचे वातावरण आहे.
घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी , आष्टी प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून शोधकार्य सुरू केले होते. काही वेळाने या शोधात राजेंद्र गोल्हार यांचा मृतदेह सापडला. मृतदेहाची स्थिती भीषण होती, त्यांचा एक पाय मृतदेहाला नसल्याचे समोर आले. व गळ्याला इजा झाली आहे हा भयावह दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून गावकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने परिसरातील सर्व नागरिकांना रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये, अशी कठोर सूचना केली आहे. विशेषत: संध्याकाळीनंतर एकट्याने फिरणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. जंगली जनावरांपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a comment