पिडीतेचा गर्भपात; आरोपी अटकेत

गेवराई । वार्ताहर

भावाला जीवे मारण्याची धमकी देत 15 वर्षिय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना गेवराई तालुक्यात समोर आली. पिडीता पाच महिन्यांची गर्भवती झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पिडीतेचा गर्भपात झाला असून या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली गेली आहे.

गेवराई तालुक्यातील एका गावात 15 वर्षिय पिडीता 10 डिसेंबर 2019 रोजी शाळेतून दुपारी घरी येत असताना रामेश्वर आत्माराम माळी याने तिला भावाला जीवे मारण्याची धमकी देत एका पडक्या वाड्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे पिडीतने ही बाब कुणाला सांगितली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात भरती केले असता ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले व या प्रकरणाला वाचा फुटली. पिडीतेचा गर्भपातही झाला. दरम्यान, या प्रकरणी पिडीतेच्या जबाबावरुन रामेश्वर आत्माराम माळी (वय 21) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेवराई पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली असून तपास पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड या करत आहेत

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.