सरपंच, सदस्य दाम्पत्याला ठरवले अपात्र

बीड । वार्ताहर

 

वडवणी तालुक्यातील केसापुरी-ढोरवाडी ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर सरपंच आणि सदस्य असलेले माने दाम्पत्याला अपात्र करण्यासाठी विरोधात अनिता काळे यांनी ड.दिपक कुलकर्णी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात अपील केले होते. यावर जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिला असून सरपंच व सदस्य यांना अपात्र ठरविले आहे.

 

वडवणी तालुक्यातील केसापुरी व ढोरवाडी गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. 2022 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचात निवडणुकीअंतर्गत 18 डिसेंबर 2022 रोजी केसापुरी-ढोरवाडी ग्रामपंचायत साठी मतदान होऊन 20 डिसेंबर 2022 रोजी निकाल लागला. सदरील निवडणुकीत या ग्रामपंचायतीसाठी ’अनुसूचित जाती’ प्रवर्गासाठी सरपंच पद सुटले होते. यावर गैरअर्जदार असलेले आत्माराम सखाराम माने यांनी सरपंच पदासाठी असलेल्या प्रभाग क्रमांक 999 मधून ’व्होलर-अनु.क्रं.26’ या जातीच्या प्रमाणपत्राधारे निवडणूक लढवून सरपंच पदी निवडून आले. तसेच सरपंच माने यांच्या पत्नी असलेल्या कालिंदा माने यांनीही केसापुरी-ढोरवाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ’अनुसूचित जाती’ प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक.2 मधून ’व्होलर-26’ या जातीच्या प्रमाणपत्राआधारे निवडणूक लढवून विजयी झाल्या. परंतु या दोन्ही विजयी झालेल्या उमेदवारांनी नियमानुसार आपल्या जात प्रमाणपत्राची वैधता अर्थात पडताळणी समितीकडून मिळविलेले जातवैधता प्रमाणपत्र तब्बल एक वर्ष उलटूनही  सादर केले  नाही. याप्रकरणी केसापुरी येथील रहिवाशी असलेल्या अनिता नवनाथ काळे यांनी विधिज्ञ दीपक कुलकर्णी यांच्या 2 जानेवारी 2024 मार्फत जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सरपंच आत्माराम सखाराम माने व सदस्य कालिंदा आत्माराम माने यांना अपात्र करण्यासाठी अपील केले होते. याप्रकरणावर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने 5 ऑगस्ट 2024 निर्णय देत सरपंच व सदस्य असलेल्या पती-पत्नीला अपात्र ठरवले. अर्जदार अपीलकर्ते यांच्या वतीने विधिज्ञ अ‍ॅड.दीपक कुलकर्णी व ड.विकास मिसळ यांनी कामकाज पहिले

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.