केज । वार्ताहर
येथील बसस्थानकातून एका सेवानिवृत्त नागरिकाच्या गळ्यातील 34 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेली. ही घटना 16 जुलै रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली.
चंद्रकांत संतराम गुळवे (वय 68, रा.रेणापूर जि.लातूर) हे प्रवासादरम्यान केज बसस्थानकात आलेले असताना ही घटना घडली. चोरट्याने त्यांची एक तोळे वजनाची सोन्याची चैन चोरून नेली. या प्रकरणी गुळवे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Leave a comment