चोर समजून जमावाने केली होती बेदम मारहाण;उपचारादरम्यान झाला होता मृत्यू
बीड । वार्ताहर
पोलीस अधिक्षक बीड व अप्पर पोलीस अधीक्षक बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना पोलीस ठाणे आष्टी पोलीस ठाण्यात सन 2020 मध्ये दाखल खूनाच्या गुन्हयातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यास आष्टी पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, अंबादास उर्फ पिंटु बर्डे (वय 47 वर्ष, रा काळेवस्ती, फत्तेवडगांव ता.आष्टी) असे त्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा घडल्यापासून तो पोलीसांना चकवा देत फिरत होता.16 जुलै 2020 रोजी ही घटना घडली होती. मौजे फत्तेवडगांव (ता.आष्टी) येथे गावांतील काही लोकांनी चोर समजून हकीम ईश्वर्या भोसले, (वय 26 वर्ष रा पुंडी वाहीरा ता.आष्टी) यास मारहाण करुन जखमी केले होते; उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोशि. बंडु किसन दुधाळ यांच्या फिर्यादीवरुन आष्टी ठाण्यात खून व अॅट्रासिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील फरार आरोपी पिंटु बर्डे हा गुन्हा नोंद झाले पासुन फरार होता. परंतु गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्यानंतर आरोपी अंबादास उर्फ पिंटु भाऊसाहेब बर्डे यास तो घरासमोर उभा असल्याची बातमीवरुन पकडण्यासाठी पोलीस गेले असता तो पळून जावू लागला परंतु गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन मोठ्या शिताफीने त्यास पकडले. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उस्मान शेख, उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे, सफौ. तुळशिराम जगताप, पोह. पि.टी चव्हाण, विकास राठोड, राहुल शिंदे, बाळु सानप व चालक नामदेव उगले यांनी केली आहे.
Leave a comment