तलवाडा । वार्ताहर
तलवाडा 33 के.व्ही.च्या आदिपत्या खाली मिरगावचे 33 केव्ही उपकेंद्राशी सलग्न असलेल्या भोगलगावच्या पूर्व परवानगी घेऊन विद्युत रोहित्राचे काम सुरु अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने एक तरुण गंभीररित्या भाजला गेला. रविवारी (दि.19) रोजी ही घटना घडली. महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे ही घटना घडल्याने गावकर्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
अनिल भानुदास भालेराव (34 रा.भोगलगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. रविवारी उपकेंद्रातून पूर्व परवानगी घेवून भोगलगाव येथील विद्युत रोहित्राचे काम केले जात होते. मात्र अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने अनिल हा तरुण गंभीररित्या भाजला गेला, तर त्याच्यासोबतच्या इतरांनाही विज प्रवाहाचा धक्का बसला. दरम्यान जखमी तरुणावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. सदरिल तरुण एक गरीब कुटुंबातील सदस्य आहे. त्याच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन त्याची स्थिति काय आहे याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. दरम्यान निष्काळजी कारभार करणारे वीज ऑपरेटर यापुढे तलवाडा व मिरगाव उपकेंद्रात कर्तव्यावर ठेवू नयेत अशा संतप्त भावनाही ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
Leave a comment