कोरोनामुळे "सोनार कारागीरांवर" लॉकडाऊनचे मोठे आर्थिक संकट
बीड./ प्रतिनिधी
देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशा बिकट परिस्थिती व कोरोनामुळे सोनार व्यापार बंद असल्याने जेमतेम कारागिरी करून पोट भरत असलेले कारागीर यांना लॉकडाऊन चे 'मोठे' आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज असून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी असे आवाहन सोनार सुवर्णकार कारागीर यांनी केले आहे.
जगात कोरानाच्या विषाणुने थैमान घातले आहे. कोरोनाचे संकट हे वेगवेगळ्या स्वरूपात अनेक लोकांना जाणवत आहे, फक्त कोरोना बाधितच याला अपवाद नसून या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने "लॉकडाऊन" जाहीर केल्यानं लहान- मोठया व्यावसायिकाना आर्थीक संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील विविध ठिकाणी लग्न समारंभ, प्रोग्राम, कार्यक्रमात लागणारे दागीने खरेदी अश्या बिकट अवस्थेत शक्य होत नाही. लॉक डाऊनमुळे सराफा व्यवसाय बंद असल्याने सोनार कारागीर काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू शकत नाही. कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून अश्या परिस्थितीत कुटुंब चालविण्यास मोठे संकट समोर आले असल्याचे दिसत आहे.
कोरानाच्या लाॅकडाऊनमुळे रोजच्या रोज कष्टातून मिळणाऱ्या रोजगाराचा अर्थात पोटापाण्याचा प्रश्न ऊभा राहिला आहे. कोरोनाचे संकट आल्यामुळे कुटुंबाचे पोट कसे भरावे ,हा मोठा प्रश्न कारागीर समोर ऊभा आहे. तेंव्हा या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व शासन पातळीवरील नेतृत्वाने हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी सोनार कारागिरांना आर्थिक मदत जाहीर करून न्याय द्यावा अशी मागणी विजुशेठ कुलथे , सुधाकर दहिवाळ, जनार्धनराव दहिवाळ,कैलास मैड, देवाशेठ मानुरकर, भास्करराव बागडे, अनिल जोजारे, हिम्मत बेद्रे, गणेश बागडे, कल्याण डहाळे, अशोक लोळगे, हन्नू डहाळे आदींनी केली आहे.
Leave a comment