बीड | वार्ताहर

ऊसतोड मजुरांना स्वगृही परत जाण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांच्यासाठी मार्ग निश्चित केले आहेत. छुप्या मार्गाने अथवा वैद्यकीय चाचणीशिवाय तसेच तेथील प्रशासनाने परवानगी दिल्याशिवाय येणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला.

लातूर, बर्दापूरमार्गे अंबाजोगाई, कळंब, माळेगाव, युसूफवडगाव मार्गे केज,बोरगाव मार्गे केज, तेरखेड मार्गे चौसाळा, वाकीमार्गे आष्टी, खडकत मार्गे आष्टी, जामखेडमार्गे सौताडा, जामखेड, साकेतमार्गे पाटोदा, चिंचोडी पाटील,धानोरा मार्गे कडा, आष्टी, दौलावडगाव, धामणगाव मार्गे अंमळनेर, पाथर्डी, मातोरी मार्गे मादळमोही,शेवगाव, महारटाकळी मार्गे उमापूर, मानूरमार्गे शिरुर, शहागाड , खामगाव मार्गे गेवराई असे मार्ग निश्चित केले आहेत. तेथे पोलीस बंदोबस्त तैनात राहील, असे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कळवले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.