गेवराई ( वार्ताहर )
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन झाल्याने, शेकडो लोक गेवराई शहरात अडकलेले आहेत. अशा ३५० भुकेलेल्यांना स्वखर्चाने शिवस्वराज्य ग्रुप च्या वतीने गेल्या 14 दिवसांपासून अन्नदानाचा महायज्ञ सुरू आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे.
कोरोनामुळे तालुका लॉक डाऊन करण्यात आला असून, संचारबंदीही कडक करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बेघर, गरीब आणि इतर जिल्ह्यातील अडकलेले ट्रक ड्रायव्हर, मजूर आशा ३५० लोकांना दररोज प्रत्यक्ष जाऊन शिवस्वराज्य ग्रुप चे पदाधिकारी जेवणाचे डबे पोहोच करत आहेत. अन्नदानाचे काम गेल्या काही दिवसापासून हे तरुण मोठ्या जोमाने करत आहेत.या मध्ये सचिन नाटकर, अशोक जवंजाळ, अमित कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी, प्रशांत घोटनकर, महेश नीलकंठ, योगेश कापसे, सुरेश कापसे, निलेश ढाकणे, सुदर्शन गुळजकर, प्रसाद जोशी, अभय पाटील,
अविनाश कुलकर्णी, सोनू ब्रह्मनाथे, बळीराम सोनवणे, ईश्वर घोलप या तरुणांनी एकत्र येवुन लॉक डाऊन झाल्याने या नागरिकांना स्वखर्चाने आणि आपापल्या घरातून जमेल कसे धान्य, भाजीपाला हे अन्नदानसाठी लागणारी प्रत्येक वस्तू आणायची आणि स्वयंपाक करून सर्वांना जेवण द्यायचे. शिवस्वराज्य ग्रुप चे सदस्य एकत्र येऊन स्वतः स्वयंपाक करून भुकेल्यांना जेवण पोहोच करत आहेत. व गोरगरीबांच्या पोटात दोन घास अन्नदान करण्याचे उत्तम काम करत आहे.
Leave a comment