20 एप्रिल पासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली चालू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार आता देशभरातील टोलनाक्यांवर खाजगी तसेच व्यवसायिक वाहनांकडून टोल घेतला जाणार आहे. सरकारने कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन दरम्यान 25 मार्च पासून टोलवसुली थांबवली होती. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंची ने – आण करणे सोपे झाले होते.
लॉक डाऊन च्या काळात सर्व सेवा बंद होत्या मात्र आता देशभरात कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी 20 एप्रिल पासून सवलत मिळण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात काही अटी लागू करून उद्योगधंद्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक व खाजगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.
यामुळे 20 एप्रिल पासून सर्वांना प्रवास करताना टोल सुरू केला जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गवरील टोल वसुली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देखील टोल वसुली सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
Leave a comment