नेकनूर/वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात नव्याने येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करण्यासाठी ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यातील एका कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्या प्रकरणी नेकनूरमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाहेरून आलेले नागरिक यामुळे कोरणा संसर्गाचा धोका वाढेल यासाठी खबरदारी म्हणून गाव पातळीवर अशा नागरिकांची नोंदणी घेण्याचे काम सुरू आहे
विनायक साळुंके हे आरोग्य कर्मचारी नवीन नागरिकांच्या नोंदणी करत असताना मोजम मेहेरहुसेन शेख आणि मुकरम सय्यद हुसेन शेख यांनी साळुंके यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या कामात अडथळा आणल्या प्रकरणी नेकनुर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जाधव, बामदळे हे करीत आहेत
Leave a comment