ठेवीदारांच्या ठेवी परत न करणे अंगलट
माजलगाव । वार्ताहर
तालुक्यातील जि.प.शिक्षक रमेश ढगे याची राजर्षी शाहू मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाविरुद्ध पाथरी शहर पोलीस ठाण्यात ठेवीदारांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अण्णासाहेब सोनाजी घाटोळ (70,शेती रा.ढालेगाव ता.पाथरी ह.मु.एकतानगर पाथरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे व या प्रकरणातील साक्षीदार यांचे मिळून 1767961 रु 1 जानेवारी 2016 रोजी 10 ते दि.31 मार्च 2022 रोजी 10 वा. या काळात राजर्षी शाहू महाराज अर्बन मल्टीस्टेट सोसायटी पाथरी येथे ठेव स्वरूपात ठेवले होते.अण्णासाहेब घाटोळ व साक्षीदार यांचे राजर्षी शाहू महाराज अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड माजलगाव शाखा पाथरी यातील आरोपी महानंदा रमेश ढगे, रमेश ढगे, पुरुषोत्तम मुंजाभाऊ राठोड,दिलीप लक्ष्मीकांत देशमुख,दिलीप भिमराव थोरात, गोपीनाथ सुखदेव जगाडे,महादेव किशन अलझेंडे,मीरा धोंडीराम वाघमारे, नागेश आश्रोबा गरड, संजय गोपीकिशन भूतडा,शबाना ताहेर खान पठाण, सुहास गोविंदराव टाकनकर यांनी घाटोळ यांचे मूळ रक्कम व व्याजासह रक्कम वारंवार मागुनही परत न करता साक्षीदार व फिर्यादी यांची फसवणूक केली म्हणुन गुन्हा कलम 409,420,34 भा.दं.वि.सह कलम 3,4 एमपीआयडी अॅक्टनुसार 20 मे रोजी दाखल करण्यात आला.पुढील तपास उपनिरीक्षक कुसमे हे करत असून सर्व आरोपी फरार आहेत.
रायसोनी,शुभकल्याण,परिवर्तननंतर राजर्षी शाहूचा नंबर?
हा गुन्हा दाखल झाल्यामुळे माजलगाव शहरातील पतसंस्था, मल्टिस्टेट तसेच निधी अर्बन बँकेच्या ठेवीदारांत खळबळ माजली आहे.यापूर्वी जळगाव येथील हिराचंद रायसोनी,आपेट यांची शुभकल्यानं,राष्ट्रवादी नगरसेवक विजय अलझेंडे यांची परिवर्तन मल्टिस्टेटच्या संचालकांनी माजलगाव तालुक्यातील करोडो रुपये हडप करून पोबारा केला आहे.आता राजर्षी शाहू अर्बन मल्टिस्टेटचा नंबर आहे की काय, अशी चर्चा जोरू धरू लागली असून लवकरच आणखी एका मल्टिस्टेटचा मोठा घोटाळा उघड होणार असल्याची चर्चा मागील महिनाभरापासून सुरू आहे.
------
Leave a comment