परस्परविरोधी तक्रारीवरुन पाच जणांवर गुन्हा
पिंपळनेर । वार्ताहर
दोन गटात शिवीगाळ करत एकमेकांना लाथाबुक्क्यांसह डोक्यात दगड मारुन हाणामारी झाली.बीड तालुक्यातील मुगगाव येथील एका पेट्रोलपंपासमोर बुधवारी (दि.15) ही घटना घडली.परस्परविरोधी तक्रारीवरुन पाच जणांवर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
विवेक बाबासाहेब दुबाले (रा.मुगगाव) यांच्या तक्रारीनुसार, ‘तू भंगार विकून प्लाट घेतला काय?’असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली.डोक्यात व हातावर दगड फेकून मारत दुखापत करत सोबतच्या इतरांनाही मुक्कामार देत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरुन बालासाहेब रामनाथ दुबाले, सतिश रामनाथ दुबाले, रामनाथ मसुदेव दुबाले (सर्व रा.मुगगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. दुसर्या घटातील बालासाहेब दुबाले यांनीही तक्रार दिली. ‘तू दारु पिवून शिवीगाळ का करतो’ असे विचारल्याच्या कारणावरुन डोक्यात दगड मारुन दुखापत करत शिवीगाळ केली. व सोबतच्या सहकार्यास चापटाने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. यावरुन विवेक बाबासाहेब दुबाले व बाबासाहेब मसुदेव दुबाले (दोघे रा.मुगगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.शिवाय दोन्ही गटातील लोकांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
16
Apr
Leave a comment