बीड । वार्ताहर
चोरट्यांनी डिझेल, पेट्रोलच्या टाकीचे कुलूप तोडून दोन लाख 80 हजार रुपये किंमतीचे 3500 लिटर डिझेल आणि 500 लिटर पेट्रोल चोरून नेल्याची घटना केज तालुक्यातील मस्साजोग येथील स्वराज पेट्रोल पंपावर 15 एप्रिल रोजी पहाटे अडीच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.
मस्साजोग येथील शिवराज लिंबराज देशमुख यांचा गावापासून जवळच केज-मांजरसुंबा रस्त्यावर स्वराज नावाचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी रात्रीच्या वेळी डिझेल आणि पेट्रोलच्या टाकीला कुलूप लावून झोपले. कर्मचारी हे भर झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी 15 एप्रिल रोजी पहाटे 2.30 ते सहा वाजेच्या दरम्यान पंपावर आले. त्यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या टाकीचे कुलुप तोडून 3500 लिटर डिझेल आणि 500 लिटर पेट्रोल काढून घेतले. चोरटे हे दोन लाख 80 हजार रुपयांचे डिझेल व पेट्रोल घेऊन पसार झाले. शिवराज देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिनकर पुरी हे पुढील तपास करत आहेत.
Leave a comment