आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी रुग्णालयीन कर्मचार्यांना दिले प्रात्यक्षिक प्रशिक्षण
बीड । वार्ताहर
अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोरोेना रुग्णांसाठीच्या आयसीयू विभागाला लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला होता. या घटनेनंनतर राज्यभरातील सर्वच शासकीय रुग्णालयांच्या अतिदक्षता कक्षातील वातानूकूलन यंत्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हाच धागा पकडत बीड जिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णालयीन कर्मचार्यांना सोमवारी (दि.8) आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना 15 दिवसात फायर,विद्युत ऑडीट करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्या आहेत.
आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशामक अधिकारी धायतडक व कानतोडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, डॉ.राम आवाड,श्रीमती सहाय्यक अधिसेविका महानवर,शिला बनसोड, विद्या कुलकर्णी,कुडके, धांडे, मेघा जाधव, बाजपेयी, यादव,सुजाता जाधव व इतर सर्व परिसेविका तसेच शेख रियाज,औषध निर्माण अधिकारी,जितेंद्र देशपांडे, कार्यालयीन अधिक्षक व इतर कर्मचार्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण करून दाखवले. जिल्हा रुग्णालय अधिनस्त सर्व आरोग्य संस्थातील फायर ऑडिट झालेले आहे. उपाययोजनेसाठी जिल्हाधिकार्यांकडे निधीची मागणी केलेली आहे.बीड जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांना फायर ऑडिट व इलेक्ट्रीक ऑडिट 15 दिवसात करुन घेण्याबाबत सूचना दिलेल्या असून ज्या रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रीक ऑडिट झालेले नाही अशा रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग अॅक्टची पूर्नेनोंदणी दिली जाणार नाही असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळेंनी दिला आहे.
तर बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट
अंतर्गत नोंदणी रद्द होणार!
अहमदनगर जिल्हा रुग्णालयासारखी दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळे यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या अधिनस्त सर्व डॉक्टरांकडून अहवाल मागवला आहे. त्यात सर्व रुणालयांनी सक्षम प्राधिकरणामार्फत फायर ऑडीट, विद्युत ऑडीट 15 दिवसाचे आत करुन घेणे बंधनकारक आहे.दोन्हीही ऑडीट करून घेतले असल्यास अहवालामध्ये आढळुन आलेल्या त्रुटी व त्या त्रुटीची पुर्तता केली असल्यास त्या बाबतचा अहवाल तीन दिवसात सादर करावा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट कशी केली जाते, त्यासंबंधी माहिती तसेच स्वतंत्र प्लान्ट आहे किंवा चंपावती वेस्ट मॅनेजमेट यांचेशी करार केला आहे या बाबतचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे.हा सर्व अहवाल न दिल्यास त्यांच्या रुग्णालयाची बॉम्बे नर्सिग होम अॅक्ट अंतर्गत होणारी पुर्न नोंदणी प्रमाणपत्र हे यापुढे निर्गमीत करण्यात येणार नाही तसेच 15 दिवसानंतरही कार्यवाही केली नाही तर संबंधीत रुग्णालयाचे बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट अंतर्गत नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.
अर्धवट बांधकामात रुग्णालय चालवता येणार नाही
जिल्ह्यात बर्याच रुग्णालयाचे बांधकाम अर्धवट स्थितीत असताना त्या ठिकाणी रुग्णालय चालू असल्याचे आढळून आले. त्यामुळे रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले या बाबतचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र यापुढे सोबत जोडावे लागणार आहे. त्याशिवाय रुग्णांवर उपचार करता येणार नाहीत.
Leave a comment