खर्डा । वार्ताहर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एकच राष्ट्रीयकृत बँक शाखा आहे. त्यामुळे या शाखेत पैसे काढण्यासाठी ग्राहकाचे मोठी गर्दी होते. त्यात सलग दोन दिवस सुट्टी आल्याने बँकेत मोठी तोबा गर्दी झाली.
बँक शाखा समोर पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहून बँकेचे शाखा अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी लोकांना एक फुटाचा अंतर ठेवण्या चे आव्हान केले. कोरोना मुळे खर्डा येथे संपूर्ण लॉक डाऊन असल्यामुळे खर्डा येथे सर्व व्यवहार व दुकान बंद असल्यामुळे बँकेसमोर खात्यातील रक्कम काढण्यासाठी मोठी गर्दी झाली नागरिकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. पेन्शन धारकांना दुध उत्पादक शेतकर्यांना व सर्व सामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकार ने सर्वसामान्य लोकांच्या महिला च्या जनधन खात्यात पाचशे रुपये जमा केल्यामुळे खात्यातील रक्कम काढण्यासाठी बँकेसमोर एकच मोठी गर्दी जमा झाली आहे. सरकारने दिलेली 500 रू. मदत गरिबाची चेष्ट उडवणारी आहे.
सध्या खर्डा येथील सेंट्रल बँकेत 40 हजार ते 42 हजार हजार आस पास खातेदार आहेत. त्यात बँकेत अपुरे कर्मचारी असल्या मुळे पैसे काढण्यासाठी अडचणी येत आहेत. तरी खर्डा येथे स्टेट बँकेची शाखा व्हावी अशी मागणी ग्राहक वर्गात जोर धरत आहे.खर्डा येथे राष्ट्रीय बँक असल्यामुळे पैसे काढण्यास वेळ लागत आहे सर्वांनी एक फुटाचं अंतर ठेवून आवाहन केले. सेंटर बँक शाखा अधिकारी अमोल गोडभरले यांनी सांगितले.
Leave a comment