मुंबई । वार्ताहर
बांद्रा येथे जमाव प्रकरणी मराठीतील आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अटक झाल्यानंतर आणखी एका वाहिनीच्या अँकर आणि वार्ताहरावर कारवाई करण्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत, या संदर्भात त्यांनी मध्यरात्री ट्विट केले आहे.फेक न्यूज’पसरवल्याप्रकरणी एका वृत्तवाहिनीच्या वार्ताहराला यांनी पोलिसांनी अटक केली आहे. आता आणखी एका चॅनेलच्या पत्रकार आणि अँकरवर कारवाई केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच एका वृत्तवाहिनीने गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत एक वृत्त 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले. यात आव्हाड हे कोरोनाबाधित आहेत असे सांगण्यात आले.यासोबत आव्हाड यांची मुलगी 16 मार्च रोजी स्पेनहून भारतात परतली. ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यानंतर आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली असलयाचा दावा या बातमीत करण्यात आला होता. हा दावा खोटा असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले असून, या चॅनेलने कोणत्याही रुग्णाचे नाव जाहीर न करण्याच्या आचारसंहितेची पायमल्ली केली आहे.चॅनेलचे वर्तन गैरजबाबदार आणि हेतूपुरस्सर आहे. देशात भीतीचे वातावरण असताना घबराट पसरवणाऱ्या बातम्या दाखवणे चुकीचे असून, बातमी देणाऱ्या पत्रकार आणि निवेदक या दोघांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
Leave a comment