बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील बँकिंग आर्थिक व्यवहारांसाठी जनतेला होणार्या अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका जसे एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र इत्यादी च्या खातेदार ग्राहकांना इंडिया पोस्ट पेमेंट बँक माधमातून 15 एप्रिल 2020 पासून आधार सक्षम प्रक्रियेद्वारे 10 हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम काढणे, शिल्लक रक्कमेची चौकशी,मिनी स्टेटमेंट,धनादेशचे व्यवहार करता येईल असे स्टेट बँकऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्या सूचनेनुसार इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक नितीन पाटील यांच्याशी याबाबत समन्वय साधण्यात आला आहे.जिल्ह्याच्या ग्रामिण भागात पोस्ट विभागाच्या मोठ्या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.आधार सक्षम पेमेंट कोणत्याही राष्ट्रीयकृत तसेच अशी यंत्रणा कार्यान्वित केलेल्या मोठया खाजगी क्षेत्रातील बँक व शाखेच्या ग्राहकांना बायोमेट्रिक प्रक्रीयेचा वापर करुन त्यांच्या खात्यातून दररोज 10 हजार रुपयाच्या मर्यादेपर्यंत रक्कम काढू शकतात.याबरोबर ग्राहकांना शिल्लक रक्कम चौकशी, मिनी स्टेटमेंट तसेच चेक सिस्टम प्लॅटफॉर्मवरील चेक क्लिअरिंग सुविधा सारखे व्यवहार करण्यात येईल.सरकारने कोविड 19 च्या अनुषंगाने निधी जन धन खात्यात जमा केला आहे.यामुळे ग्राहकांना बँकांच्या शाखेतून पैसे काढण्याची गरज नाही.
Leave a comment