बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे परवानाधारक मद्य दुकाने बंद आहेत. याचा फायदा घेत गावठी हातभट्टीचालकांनी डोके वर काढले आहे. जिल्ह्यात अवैध दारुविके्रत्यांचा सुळसुळाट सुरु असून 48 तासांत तब्बल 51 गुन्हे नोंद झाले. यामध्ये सुमारे तीन लाखांहून अधिक रुपयांची हातभट्टी नष्ट करण्यात आली. पोलिसांनीच केलेल्या कारवायांमधूनच ही बाब समोर आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, जिल्हाबंदी, संचारबंदी, वाहतूकबंदी लागू आहे. त्यामुळे मद्यपींची मोठी पंचाईत झाली आहे. काही मद्यपींनी आपला मोर्चा गावठी हातभट्टीकडे वळविला आहे. परवानधारक दारु दुकाने बंद असल्याचा फायदा घेत गावठी हातभट्टीवाल्यांनाही आता सुगीचे दिवस असल्याचे चित्र आहे. महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच 28 ठाण्यांतर्गत अवैध दारुविक्रेत्यांवर कारवायांचे निर्देश होते. त्यानुसार 13 एप्रिल रोजी 11 ठिकाणी छापे टाकून 60 हजार 798 रुपयांची गावठी दारु हस्तगत करण्यात आली.या प्रकरणी 11 गुन्हे नोंद केले आहेत. 14 एप्रिल रोजीही अवैध दारुविक्रीविरोधात मोहीम राबविली. दिवसभरात 40 गुन्हे नोंद करुन सुमारे दोन लाख 56 हजार 282 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन दिवसांत मिळून सुमारे 51 गुन्हे नोंद केले असून 3 ला, 17 हजार 90 रुपयांची हातभट्टी नष्ट करण्यात आली.
15
Apr
Leave a comment