मुंबई । वार्ताहर
वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात काल संध्याकाळी उसळलेल्या गर्दी प्रकरणी पोलिसांनी पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अटक केली आहे. अडकलेल्या मजुरांना गावी नेण्यासाठी ट्रेन सुरू केल्या जाणार असल्याचं वृत्त दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. वांद्रे पोलिसांनी कुलकर्णी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. उस्मानाबाद पोलिसांनी पहाटेच त्यांना ताब्यात घेऊन मुंबईला पाठवलं.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी जनसाधारण स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचं वृत्त एबीपी माझानं काल सकाळी दाखवलं होतं. दक्षिण मध्य रेल्वेनं काढलेल्या पत्राच्या आधारे वृत्त दिल्याचं राहुल कुलकर्णींनी वार्तांकन करताना म्हटलं होतं. याच वृत्तामुळे काल दुपारच्या सुमारास वांद्र्यात गर्दी झाल्याचा दावा सोशल मीडियावर अनेकांनी केला. चुकीचं वृत्त दाखवण्यात आल्यानं मजुरांनी गर्दी केली, असा दावादेखील करण्यात आला.
कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी दुपारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्यानं तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना तेथे अतिरिक्त कुमक मागवावी लागली. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे 800 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.