आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांच्या विरोधात लॉकडाऊनच्या काळात तक्रारी वाढत असल्याने आष्टी तहसीलच्या पुरवठा विभागातील नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे,अव्वल कारकून भगीरथ धारक ,अव्वल कारकुन आदिनाथ बांदल यांनी पुरवठा विभागाचे पथक तयार करून आष्टी तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांना भेटी देऊन सूचना करीत आहेत. ग्राहकांच्या समस्या जाणून घेत रास्त भाव दुकानदारांना सूचना केल्या. स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन धान्य वितरण योजनानिहाय व मोफत धान्य व्यवस्थित शिधाकार्डधारकांना, गोरगरीब जनतेला मिळावे
यासाठी गावोगावी जाऊन स्वस्त धान्य दुकानांना भेटी देत आहेत. हे पथक 24 तास गावोगावी जाऊन कार्डधारकांना धान्य वाटत वाटप होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.कडा,धानोरा, साबलखेड, चिंचोली, देवीनिमगाव, धामणगांव, घाटापिंपरी, देवळाली, दौलावडगाव,सालेवडगाव,पुंडी, आष्टी व इतर आष्टी तालुक्यातील गावांना तहसील पुरवठा विभागातील अधिकार्यांनी भेटी देत आहेत.सर्व स्वस्त धान्य दुकानदारांचा आढावा घेतला जात आहे.
Leave a comment