केज । वार्ताहर
कै.आत्माराम पाटील प्रतिष्ठाण व कपिल मस्के विचारमंच यांच्यातर्फे केज शहरातील फुलेनगर भागातील गरजू व्यक्तीला किराणा सामानाचे 500 कीट वाटप करण्यात आल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष पशुपतिनाथ दांगट, माजी नगराध्यक्ष कबिरोदिन इनामदार, प्राचार्य डोईफोडे सर, दिनकर राऊत, समीर देशपांडे, शेख हकीम, शेख जमील, संतोष राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य मीना मस्के बाबासाहेब मस्के शेखर सिरसट आदी हजर होते.
कोरोनामुळे शहरात केवळ हातावर पोट असणार्‍या कुटूंबाना मदत म्हणून काँग्रेसचे युवा नेते व नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी नुकतेच आत्माराम पाटील प्रतिष्ठाणला स्वतःच्या वतीने 7 लक्ष रुपयांची मदत करण्यात आली यावेळी प्रत्येक भागातील अशा निवडक कुटूंबाना ही मदत देण्याच्या सूचना नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी दिल्या व त्यानुसार फुलेनगर भागात कपिल मस्के यांनी तब्बल 500 कुटूंबाना या किराणा सामानाच्या किट रविवारी वाटप केल्या. आत्माराम बापू पाटील व कपिल मस्के युवा मंच च्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम कपिल मस्के यांनी या भागात राबवल्याने या परिसरातील सदर कुटूंबाना 15 दिवस पुरेल एवढा किराणा यावेळी वाटप करण्यात आला. यावेळी आपण मदत करत आहोत हे आपलं कर्तव्य समजून मदत करा, सध्या हातावर पोट असणारे कुटूंब अडचणीत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या यामधून असे एकही कुटूंब वंचीत राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच हे सर्व वाटप करताना कोणाचेही वैयक्तिक फोटो काढू नका व सोशल मीडियावर टाकू नका अशा सूचना यावेळी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्‍यांना व नगरसेवकांना दिल्या आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.