केज । वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी केज तालुक्यातील सारणी, सांगवी,पिंपळगाव,ऐकुरका व परिसरातील शेतकर्यांचा भाजीपाला विकत घ्यायचे ठरवले व विकत घेतलेला भाजीपाला नागरिकांना मोफत वाटप करण्याचे ठरवले व या उपक्रमाची सुरवात करत माळेवाडी येथील 300कुटुंबांना भाजीपाला वाटप केला.
परिसरातील शेतकर्यांना भाजीपाला विकत घेऊन दिलासा व नागरिकांना अडचणीच्या काळात वांगे,टमाटर,फुल कोबी,भेंडी,शिमला मिरची,बटाटा आदी भाजीपाला मोफत वाटप हा मनसे चा उपक्रम लॉक डाऊन आहे तोपर्यंत चालु राहणार आहे त्यामुळे नागरिकांना भाजीपाला खरेदी साठी बाहेर जाण्याची गरज लागणार नसल्याचे मनसे चे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी सांगीलते.
Leave a comment