गेवराई । अय्युब बागवान
संसारा च गाड़ा चलवन्यसाठी नेहमी आप आपल्या कामात व्यस्त असणारे महिला पुरुष व शाळा महाविद्यालयाना सुट्टी असल्याने घरा घरात गप्पा आणि खेळांच्या मैफिलि रंगल्याचे दिसत आहे.तर काही घरात घरा बाहेरचे मधुर संबध ही उघड़े पडू लागल्याने तू तू मैं मैं होऊन रुसवे फुगवे ही जोर धरु लागले असल्याने भविष्यात हे लॉक डाउन जाताना कोणाला काय देवून जाईल याची ही चर्चा होत आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉगडाऊन करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकांना घरात राहण्यासाठी सांगितले जात आहे. कर्मचारी वर्ग आपल्या कुटुंबासोबत वेळ घालत आहे. इंटरनेटचा वापर केला तरी तोही कंटाळवांना वाटतो. अशा परिस्थितीत दुपारच्या फावल्या वेळात व संध्याकाळी प्रत्येक घरी वेगवेगळ्या खेळाची मैफिल भरली जात आहे.तर मूल मूली इतिहास जमा खेळ खेळत असल्याचे सगळीकड़े दिसत आहे.संचारबंदीमुळे घराबाहेर जाता येत नसल्याने घरामध्ये वेळ कसा घालवावा असे प्रत्येकाला वाटते. या लॉकडाऊनमुळे बहुतांश जन कॅरम, बुध्दीबळ, पत्ते आदी खेळ घरात खेळले जातात. या खेळामध्ये मुलांबरोबर आई-बाबांचे ही मनोरंजन होते. तसेच या लॉकडाऊनमुळे कुटूंबातील जेष्ठ नागरिकांना ही आपल्या नातवांसोबत वेळ घालण्यासाठी मिळत आहे. आज प्रत्येक घरात आई वडिल नौकरी करत असल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी बाहेर गावी पाठविण्यात येते. त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना वेळ देण्यासाठी कोणाकडे वेळच शिल्लक नाही. मात्र सध्या सर्वत्र आहाकार माजविलेल्या या कोरोना विषाणू मुळे देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन मुळे सर्व एकत्र येवून कुटूंबास वेळ देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र काही महिला पुरुषांना घरात बसन्याची संधी ही तुरुंगा सारखी झाली आहे,या दरम्यान नको ते एक दूसर्यां समोर येवू लागल्याने भांडणाला ही सुरुवात झाली आहे.्रकित्येक दिवसांपासून धुळ खात पडलेला कॅरम बाहेर निघाला असून कॅरम हा खेळ प्रत्येक घरात खेळला जात असल्याचे चित्र दिसत आहे. तर काही ठिकाणी पत्ते, बुध्दीबळ हा खेळ मोठ्या आनंदात खेळला जात असून सध्यांचे यूग हे यांत्रिक युग असून या यांत्रिक युगात कॉम्पुटर व टि.व्हि वरील विविध चित्रपट हे पाहता कंटाळ वाणी झाल्यांने आता नागरिकांना जुन्या खेळाला पसंती देत. सकाळी लवकर काम व जेवणे आवरून घरातील मंडळी खेळ खेळताना दिसत असून हा खेळ खेळताना ही सोशल डिस्टन्सशी ही पाळत असल्याचे दिसत आहे.
Leave a comment