माजलगाव । वार्ताहर
कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील सांडस चिंचोली व गोविंदपुर येथे श्रीराम ज्वेलर्स सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने स्वच्छता मोहिम, निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली
चिंचोलीत सोशल डिस्टन्सचे नियम पाळून युवकांनी सकाळी स्वच्छता मोहिम राबवुन नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असताना श्रीराम ज्वेलर्स वतीने सामाजिक कामात सतत अग्रेसर असणारी सेवा सहकारी सोसायटी च्या सहकार्याने चिंचोली व गोविंदपुरात सोडियम हायपोक्लोराईडची प्रभावीपणे फवारणी करण्यात आली. यावेळी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता ठेवा, घरीच रहा, हात धुवा अशा विनंतीपूर्वक सुचना गावातील ग्रामस्थांना श्रीराम ज्वेलर्स च्या वतीने देण्यात आल्या. यावेळी सांडस चिंचोली चे सरपंच कदम सर,खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब भोसले, सोसायटीचे चेअरमन श्रीकृष्ण शेजुळ,गोविंदपुर चे सरपंच अंबादास कुंडकर,राऊत साहेब ग्रामसेवक,गणेश काळे,उद्धव शेजुळ हनुमंत शेजुळ यांनी पुढाकार घेतला

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.