आष्टी । वार्ताहर
आष्टी विधानसभा मतदार संघातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचे एप्रिल, मे व जुन या तीन महिन्याचे अनुदान शासनाने त्वरीत द्यावे अशी मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे
कोरोना प्रादुर्भाव प्रभावाने देश आणि महाराष्ट्रातील जनता प्रभावित झाली आहे उद्योगधंदे बंद झाले आहेत. आर्थिक संकट निर्माण झाले असुन आष्टी, पाटोदा ,शिरुर हा भाग मागासलेला आहे.त्यामुळे या भागातील जनतेचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे.या सर्वामध्ये जे वृद्ध निराधार आहेत अशा लोकांचे हाल होत आहेत. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थ्यी आहेत त्यांना शासनाचे मासिक अनुदान हाच आधार आहे.या लॉकडाऊनचे काळात एप्रिल, मे ,जुन या तीन महिन्याचे अनुदान शासनाने त्वरीत त्यांचे खात्यावर वर्ग करावे अशी मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी पालकमंत्री व समाजकल्याण मंत्री ना. धनंजय मुंडे यांचेकडे एका पञाद्वारे केली आहे. हे अनुदान मिळाल्यास निराधारांना जगण्यासाठी मोठा आधार होणार असल्याचे माजी आ.धोंडे यांनी म्हटले आहे.
Leave a comment