बीड : देशातील कृषी बियाणे, खते व कृषी औषधी विक्रेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरणास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आॅल इंडिया अॅग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनने केली आहे. केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा तसेच केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना इ- मेल व सोशल मिडीयाद्वारे निवेदन पाठविण्यात आल्याचे आॅल इंडिया अॅग्रो इनपुट डिलर्स असोएिशनचे राष्टÑीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. २१ मार्चपासून सर्व कामे ठप्प आहेत. तेव्हापासून ई- मित्राद्वारे होणारी कृषी परवान्यांच्या नुतनीकरणाची कामे होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे कृषी खते, औषधे, बियाणांच्या परवान्यांची मुदत कुठलाही विलंबशुल्क न आकारता ३० जूनपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांबाबतही जीओआय सुविधांबाबतही सरकारने विचार करावा असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर आॅल इंडिया अॅग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री, महासचिव प्रवीणभाई पटेल, राष्टÑीय प्रवक्त संजय रघुवंशी आदी पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.
Leave a comment