बीड । वार्ताहर
राज्यात लॉकडाऊन दिनांक 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. राज्य शासनाने अधिसूचना दि. 13 एप्रिल 2020 मध्ये नमुद केले नुसार फौजदारी प्रक्रिया दंड सहिंतचे कलम 144 (1)(3) नुसार दिनांक 30 एप्रिल 2020 रोजीचे रात्री 12 वा. पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
या कालावधीत संपुर्ण जिल्हयातील जिवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणार्‍या किरकोळ विक्री करणार्‍या आस्थापना सकाळी 7 ते 9.30 वाजेपर्यंत दिनांक 15,17,19,21,23,25,27,29 एप्रिल 2020 या दिवशी चालू राहतील. तसेच जिवनावश्यक वस्तूंच्या आस्थापनासाठी 8 एप्रिल 2020 च्या आदेश मधील सर्व नियम व अटी लागू राहतील.यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले संदर्भीय आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अमंलात राहतील. यापूर्वीच्या आदेशान्वये दिनांक 14 एप्रील 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड सहिंताचे कलम 144 (1)(3) नुसार रात्री 12.00 वा.पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेली होती. आजच्या आदेशांने प्रतिबंधात्मक आदेशांना 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढ देण्यात आली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.