अंबाजोगाई । वार्ताहर
जागेच्या वादातून दोनगटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील अकोला येथे सोमवारी (दि.13) घडली. परस्परविरोधी फिर्यादीवरुन सहा जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
चंद्रसेन दत्तात्रय शेवाळे (38,रा.अकोला) यांच्या फिर्यादीनुसार, मोकळ्या जागेत कचरा टाकल्यावरुन चंद्रसेन शेवाळे व आशा शेवाळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. कुंडलिक काळवा शेवाळे, गुणवंत कुंडलिक शेवाळे, पोपट कुंडलिक शेवाळे, शालूबाई कुंडलिक शेवाळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. दुसर्या गटातील शालूबाई कुंडलिक शेवाळे यांच्या फिर्यादीवरुन ‘आमच्या जागेतील चिंचेच्या झाडाचे फाटे का तोडले? या कारणावरुन काठीने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली’ म्हणून चंद्रसेन दत्तात्रय शेवाळे (रा. अकोला) व अजय अर्जुन वाघमारे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) यांच्यावर गुन्हा नोंद झाला.
Leave a comment