अंबाजोगाई | वार्ताहर

ओरिसा राज्यातील एका 40 वर्षीय मजुराचा येथील स्वाराती रुग्णालयात आज मंगळवारी (दि.14) सकाळी मृत्यू झाला. मागील दोन दिवसांपूर्वी त्याला कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सायंकाळपर्यंत प्राप्त होणार आहे; तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली संबंधित रुग्णास न्यूमोनिया होता अशी माहिती पुढे आली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,हा संशयित मुळचा ओरीसा राज्यातील आहे. एका बोअरवेलच्या गाडीवर तो मजुरी करत असे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश्य लक्षणांमुळे त्याला स्वारातीच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास या रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, काल सोमवारी त्याचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून अद्याप रिपोर्ट आलेला नाही. आज सायंकाळपर्यंत रिपोर्ट येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता की नाही हे समजू शकणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.

Comments (1)

  • anon
    खिस्ते ओंकार (not verified)

    त्वरित बातमी मिळाली
    धन्यवाद

    Apr 14, 2020

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.