देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक राज्यांनी लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी केली. दरम्यान, उद्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला मंगळवारी सकाळी १० वाजता संबोधित करणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांचे लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी यावर पंतप्रधान कोणता निर्णय घेणार हे उद्या कळणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. सकाळी ९ वाजता रामायण लागते, त्यामुळेच पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्यासाठी १० ची वेळ निवडल्याचे बोले जात आहे.
Leave a comment