बीड । वार्ताहर
संचारबंदी शिथील असलेल्या काळात शहरात दुचाकी घेऊन फिरु नये असे आवाहन पोलिसानी केले होते मात्र तरीही नागरिक अनावश्यक दुचाकी घेऊन फिरत आहे. सोमवारी सकाळी सात ते साडेनऊ या अडीच तासांच्या काळात तब्बल 440 दुचाकींवर कारवाई केली गेली.
शहरात संचारबंदी व जमावबंदीची प्रभावी अंमलबजावणी सध्या पोलिसांकडून सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत संचारबंदी शिथील केली जाते. या काळात नागरिकांनी दुचाकी घेऊन शहरात फिरू नये असे आवाहन बीड पोलिसांनी केले होते. मात्र, अनेक नागरिक अनावश्यकरित्या काळात दुचाकी घेऊन शहरात फिरतात. आतापर्यंत हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई केली गेली आहे. सोमवारी पोलिसांनी कारवाईची मोहिमच राबवली. वाहतूक शाखा निरीक्षक राजीव तळेकर व सहकार्यांनी विविध भागात अडीच तासांत तब्बल 440 दुचाकींवर कारवाईचा बडगा उगारला.
Leave a comment