संचारबंदी आणि लॉकडाऊन परिस्थितीचा घेतला आढावा
बीड । वार्ताहर
सध्या संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी तसेच इतरांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता तर निर्माण होते का ? आरोग्यासह इतर अडचणी काय आहेत यासंदर्भात माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली तसेच समस्याही जाणून घेतल्या.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाने लॉकडाऊन आणि संचार बंदीचे आदेश जारी केले आहेत. या काळामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी व आरोग्यसेवेसाठी नागरिकांना बाहेर पडता येत आहे. ग्रामीण भागांमध्ये शेती आणि शेतीपूरक कामे करण्यासाठी मुभा दिली आहे. रोजगार बंद असल्या कारणामुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी कामगारांची उपासमार देखील होते आहे की काय? मतदारसंघांमध्ये आरोग्य संदर्भातील सुविधा सुरळीत सुरू आहेत का? प्रशासनाकडून दिले जाणारे रेशन हे ये लाभार्थींपर्यंत पोहोचतात का? जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा बंदी आदेश दिलेले आहेत हे मोडून अन्य जिल्ह्यातून कोणी गावामध्ये शिरकाव करतात का? मतदार संघातील लोकांना या कोरोना संदर्भातील प्रादुर्भाव रोखण्याच्या उपायोजना माहिती आहेत का? यासह आणि प्रकारच्या समस्या उपाययोजना आणि पोलिस बंदोबस्त संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी सोमवारी बीड मतदारसंघातील लोकांशी मोबाईल व्हिडिओ कॉन्फरन्स ही संगणकाला कनेक्ट करून संवाद साधला आहे.
बीड मतदारसंघातील शेतकर्यांनी संवाद दरम्यान समस्याही मांडले आहेत यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून बीड शहरामध्ये असलेले कृषी दुकानांमधून शेती पूरक साहित्य घेऊन जाण्यासाठी वेळ कमी पडत आहे. प्रशासनाकडून शेतकर्यांसाठी शेती पूरक साहित्य शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत- शेतापर्यंत घेऊन जाण्याकरिता वेळेमध्ये अधिकची सवलत देण्यात यावी तरच शेतीचे काम हे चांगल्या पद्धतीने करता येतील अशी मागणी देखील शेतकर्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माजीमंत्री क्षीरसागर यांच्याकडे केली आहे संचारबंदी च्या काळामध्ये बीड मतदारसंघातील शेतकर्यांना अडचणी व अन्य प्रशासकीय समस्यांपासून सुलभता कशी देण्यात येईल यासंदर्भात सोमवारी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी थेट शेतकर्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्या.
Leave a comment