गंगाखेड । वार्ताहर
लॉकडाऊन काळात गरिब उपाशी राहू नयेत म्हणून शासनाच्या वतीने पात्र कुटुंबांना माणशी पाच किलो तांदूळ मोफत वितरीत केला जात आहे. या वितरणाचा शुभारंभ गंगाखेड शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधून आज करण्यात आला.
सोमवारी सकाळी आठ वाजता प्रभाग क्रमांक एक, तीन व चार मधील स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्य वितरणाचा शुभारंभ काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी सभापती बाळकाका चौधरी यांच्या हस्ते आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव, नगरसेवक नितीन चौधरी, सुरेश नळदकर, साबेरभाई, लॉयन्स क्लब जनाईचे सुहास देशमाने यांच्या प्रमुख ऊपस्थितीत करण्यात आला. योगेश्वरी महिला बचत गट, दत्ता हिरासींग ठाकुर, दिलीप हिरासींग ठाकुर, राधेशाम शिवनाथ बंग आदि स्वस्त धान्य दुकानांवरून हे वितरण सुरू करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसींगचे पालन करणेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला बचत गटाच्या सौ. मंगल भगवानराव बोडके, सौ. सीमा नारायण घनवटे, सौ. शिलाताई सुरेश रत्नपारखे, सौ. मंदोधरी नारायण बर्वे, सौ. पंचशीलाबाई शिवाजी तेलंग, सौ. सुमनबाई पद्माकर केरकर वितरक दिलीप ठाकुर, दत्ता ठाकुर, बंग सेठ आदिंसह लाभधारकांची ऊपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.