कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी येथील नगर पंचायत येथे सभाजभान व एक्का ङ्गौंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठान ठाणे, वैद्यकीय मदत कक्ष मुंबई यांच्या वतीने कोरोनाकाळात माणूस, समाज आणि देश यांच्यासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या सच्च्या कोरोना योध्याचा ‘मानवतेचे साथी सन्मान’ व ‘अभिमानपत्र’ देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण भारत एकजूट होऊन कोरोना या महामारी या भीषण संकटाशी लढत आहे, अशा खडतर परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संघर्ष करणारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्या अधिकारी व सामजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. हा उपक्रम एक्का ङ्गौंडेशन, समाजभान व वैद्यकीय मदत कक्ष मुंबई मार्ङ्गत संपूर्ण राज्यभरात अभिमानपत्र देऊन करण्यात येत आहे. समाजभानच्या माध्यमातून मराठवड्यामधील उल्लेखनीय कार्य करणार्या स्वयंसेवकांचा अभिमान पत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात येत आहे.
आज या सन्मानाचे मानकरी ठरलेले घनसावंगी तहसीलदारचे तहसीलदार नरेंद्र देशमुख साहेब, जालना जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती कल्याण सपाटे, पोलीस निरिक्षक शिवाजी बंटेवाड , नगर पंचायत मुख्याधिकारी विक्रम मांडुरके साहेब, पंचायत समितीचे सभापती भागवत रक्ताटे , उपसभापती बन्सीधर शेळके, नगराध्यक्ष राज देशमुख, डॉ जूजकर, डॉ लहू मिसाळ, विक्रम देशमुख, अर्जुन यादव, डॉ. गंगाधर धांडगे, डॉ.जे.बी राजुरकर , ग्रामविकास अधिकारी विनोद भगत, पत्रकार लक्ष्मीकांत कुलकर्णी ,अशोक कंटुले, अविनाश घोगरे आदींना हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपानगराध्यक्ष नवाबभाई सय्यद नगरसेवक सतीश चव्हाण,कैलास पवार, विलास गायकवाड, गणेश हिवाळे, संभाजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक आणि समाजभानचे अध्यक्ष दादासाहेब थेटे यांनी केले, तर सूत्रसंचालन समाजभानचे अरविंद घोगरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश मिरकड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजभानचे इरङ्गान खान, अरविंदजी घोगरे,शरद आधुडे,नानासाहेब देवडे,अविनाश घोगरे, अभिजित आधुडे, डॉ गंगाधर धांडगे, अनवर सय्यद, नगर पंचायतचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Leave a comment