बीड । वार्ताहर
जिल्ह्यात करोना संसर्गाची साखळी तुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. जिल्ह्यात पुन्हा नव्याने 303 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 3348 स्वॅब तपासण्यात आले. यात 3045 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित 303 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. केज 24, परळी 20, पाटोदा 61,माजलगाव 12, शिरूर 11 आणि वडवणी 15
अंबाजोगाई तालुक्यात 20, आष्टी तालुक्यात 15, बीड 57, धारूर 51, गेवराई 17, ,असा रूग्णांचा समावेश आहे.
सध्या बीड जिल्ह्यात 7534 कोरोना बाधित संख्या असून 4874 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2457 जणांवर उपचार सुरू आहेत 24 तासातच 335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आत्तापर्यंत 203 रुग्ण दगावले आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.69% आहे
कोवीड रूग्णांत ४८ ते ७२ तासांच्या आतील मृत्यूचे प्रमाण ७० टक्के ; रूग्णांनी लक्षणे जाणवताच उपचारासाठी यावे
--------------------------------
हॅप्पी हायपोक्झिया घातकच ; - डॉ.बिराजदार यांचे आवाहन
अंबाजोगाई -
कोवीड १९ मुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ४८ ते ७२ तासांच्या आत मृत होणा-या रूग्णांचे प्रमाण हे ७० टक्के असुन हे प्रमाण कमी करण्यासाठी कोवीड ची लक्षणे दिसु लागताच रूग्णांनी उपचारासाठी यावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड केअर हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड केअर हाॅस्पिटलमध्ये ४ जून २०२० रोजी कोवीडचा पहिला रूग्ण आला.या रूग्णापाठोपाठ ट्रेसिंग दरम्यान त्याच्या कुटुंबातील इतर चार सदस्य पाॅझिटीव्ह निघाले आणि ही साखळी सतत वाढत गेली.हा पहिला रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक बरे होवून घरी गेले असले याचे समाधान असले तरी नंतर वाढत जाणारा मृत्युदर हा काळजी वाढवणारा आहे.मुळात कोवीड १९ या आजाराबद्दल लोक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत,ही खंत आहे.कोवीड ची लक्षणे दिसू लागताच उपचारासाठी आलेले शेकडो रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत.कोवीड १९ मुळे उपचारासाठी येणा-या रूग्णांमध्ये पहिल्या ४८ ते ७२ तासात होणार्या मृत्यू चे दर ७० टक्के च्या आसपास आहे.असे निरीक्षण स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख तथा कोवीड केअर हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी नोंदवले आहे.
या संदर्भात बोलताना डॉ.बिराजदार पुढे म्हणाले की,कोवीडच्या भितीमुळे मानसिक ताणतणाव निर्माण होतो.यामुळे मनात एक भीती निर्माण होऊन रूग्ण स्वतः आजार कोणालाही न सांगता अंगावर काढतो.जेव्हा आजार वाढतो,तेव्हा आपल्या फुप्फुसाचा ५० ते ७० टक्के भाग हा संक्रमित झालेला असतो.तेव्हा आॅक्सीजनचा पुरवठा करणे सुद्धा अवघड होते.या आजाराचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे "हॅप्पी हायपोक्झिया".या प्रकारात शरीरातील आॅक्सीजनची पातळी कमी होऊन सुद्धा ज्या प्रमाणात दम,लागायला पाहिजे तो लागत नसल्याने रूग्णांना आपल्या आजाराचा गंभीरपणा लक्षात येत नाही.म्हणून रूग्ण उपचारासाठी उशिरा येतो व त्याचा परिणाम त्याच्यावर उपचार करणं खुपचं अवघड होतं.हे सर्व टाळण्यासाठी सर्वच कुटुंबातील वयस्कर व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे.प्रत्येक घरी पल्स आॅक्सीमिटर हे छोटेसे यंत्र असणे गरजेचे असून त्यादृष्टीने सर्दी,खोकला,ताप आलेल्या रूग्णांचे आॅक्सीजनची पातळी तपासून,वेळीच उपचार सुरू केले तर चांगले परिणाम दिसून येतील.या आजारात मानसिक संतुलन राखू्न ठेवणे हे ही खुपच गरजेचे आहे.हा आजार असतांनाही अनामिक भितीने अनेक लोक रूग्णालयात येण्यास खुप उशीर करतात.किंबहुना अत्यंत अस्वस्थ झाल्यानंतरच हे रूग्ण उपचारासाठी येतात.यामध्ये ७० वर्षांपुढील उच्च रक्तदाब,मधुमेह, न्युमोनिया,श्वसनाचे आजार व इतर आजार असणा-यांची संख्या खुप मोठी आहे.या रुग्णांच्या इतर सर्व टेस्ट करुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेळ जातो आणि परिणामी असे रूग्ण बारा ते चोवीस तासाच्या आतच दगावतात.कोवीड १९ ची लक्षणे जाणवू लागताच उपचारासाठी येणा-या रूग्णांचा मृत्युदर त्या मानाने खुप कमी आहे असे रूग्ण औषधोपचारासोबत मानसिक समुपदेशानेही लवकर बरे होतात असा अनुभव आहे.मुळात कोवीड रुग्णांना घरातील लोकांनी व समाजातील लोकांनी त्याचे मानसिक बळ वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत.ते फार कमी प्रमाणात होते असे दिसते.कोवीड विरूध्दचा लढा हा केवळ रूग्ण आणि डॉक्टर यांचाच नाही तर समाजातील सर्व घटकांचा आहे.या लढ्यात समाजातील सर्व शासनानी दिलेले सर्व निर्बंध पाळत या लढ्यात सहभागी व्हायला हवे.असे आवाहनही डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी केले आहे.
Leave a comment