बीड । वार्ताहर
रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन सस्था पुणेचे संस्थापक संचालक तथा महा एनजीओ फेडरेशनचे बीड जिल्हा समन्वयक वैभव मोगरेकर व मानव विकास संस्था शेलापुरी ता.माजलगाव जि.बीड चे अध्यक्ष हरी गिरी यांच्या पुढाकारने बीड शहरातील दोनशे दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तु चे किट वितरित करण्यात आले या वेळी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, तसीलदार आंबेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी, संस्था अध्यक्ष हरिगिरी, पत्रकार शेख रिजवान, विशाल साळुंके, मुख्याध्यापक फुलचंद लुचरे, सचिन जगताप, शेख रेहान, उमेश धुमाळ, गणेश रसाळ हे उपस्थित होते.
सध्या सर्वत्र कोरोना मुळे लॉक डाऊन आहे या काळात दिव्यांग लोकांना अडचण येऊ नये म्हणुन दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी बीड जिल्हा नोडल अधिकारी म्हणुन समाज कल्याण अधिकारी राजु एडके यांची नियुक्ती केली आहे तर जिल्हा समन्वयक म्हणुन सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी हे काम पहात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आणि शहरात असणाऱ्या गरजू दिव्यांग कुटुंबांचा शोध घेण्यात येत असुन त्यांना सामाजिक संस्थानच्या मदतीने जीवनावश्यक वस्तु वितरित केल्या जातं आहेत.
त्याचाच एक भाग म्हणुन आज सकाळी बीड शहरातील दोनशे दिव्यांग व्यक्तींना मानव विकास सेवाभावी संस्था शेलापुरी चे अध्यक्ष हरिगिरी यांच्या सहकार्याने किराणा किट ज्या मध्ये गव्हाचे पीठ, तांदुळ, साखर, मीठ, शेंगदाणे, तुर दाळ, तिखट, मसाला, आदी साहित्य वितरित करण्यात आले यामुळे अनेक दिव्यांग लोकांच्या चेहऱ्यावर हसु उमटलं होत आणि हे बांधव समाज कल्याण अधिकारी राजु एडके, सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी आणि मानव विकास संस्थेचे अध्यक्ष हरिगिरी यांना धन्यवाद देत आहेत.
Leave a comment