माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष संतोष जमधडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
जालना । वार्ताहर
देशभरासह महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात असून या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्या काळात कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता, परंतू आजही ओबीसी घटकातील समाज दुर्लक्षितच असून या समाजाला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष संतोष जमधडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात ओबीसी समाज हा मोठा घटक आहे, आणि या घटकातील समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्या काळात कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता, पण आजही ओबीसी घटकातील समाज दुर्लक्षितच आहे. तत्कालीन पंतप्रधान मा. व्ही. पी. सिंग यांनी स्व. गोपीनाथराव मुंढे, माजी उपमुख्यमंत्री ना. छगनराव भुजबळ, आदी असंख्य ओबीसी नेत्यांच्या संघर्षातून शेवटी मंडल आयोगाची स्थापना केली आणि ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण दिले. परंतु आजही त्या दिलेल्या आरक्षणाची उघड पणे पायमल्ली सुरू आहे. ओबीसींमध्ये सामाजिक आणि राजकीय मागासलेपणाचा प्रतिशोध घेण्याची मानसिकता निर्माण करण्याचे कार्य करण्याबरोबरच जातीव्यवस्था व उच्चवर्णीयाचा सांस्कृतिक दहशतवाद हाच आमच्या मागासलेपणाच्या दुरावस्थेला कारणीभुत असल्याची जाणीव मंडल आयोग स्थापनेची झाली आहे. ओबीसी समाजाची 52 टक्के लोकसंख्या असुन त्यांना केवळ 27 टक्केच आरक्षण देण्यात आले आहे ते पण तुटपुंजे आहे, त्यामुळे देशात ओबीसी समाजाची होत असलेली अवहेलना थांबुन मंडल कमिशन नुसार संपुर्ण आरक्षणाची अमलबजावणी करण्यासाठी आपण केंद्र सरकारला शिफारस करून संपुर्ण ओबीसी आरक्षण लागु करण्यास भाग पाडावे नसता संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल असेही शेवटी निवेदनावर नमूद करण्यात आले आहे.
Leave a comment