भारतात अजूनही २४ हजार अमेरिकन नागरिक
अमेरिकेने सुद्धा आपल्या नागरिकांना मायदेशी नेण्याची व्यवस्था केली आहे. पण सध्या भारतात असलेले अमेरिकन नागरिक इथेच थांबण्याला प्राधान्य देत आहेत. कारण अमेरिकेत करोना व्हायरसमुळे अत्यंत भीषण परिस्थिती आहे.
भारतात अडकलेल्या नागरिकांना परत मायदेशी नेण्यासाठी आम्ही विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. पण अमेरिकन नागरिक भारतातच थांबण्याला प्राधान्य देत आहेत असे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. ५० हजार अमेरिकन नागरिकांना पुन्हा मायदेशी परत आणले असे टि्वट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते.
भारतातील आमच्या स्टाफने ८०० अमेरिकन नागरिकांना विशेष विमानाने मायदेशी परतणार का? अशी विचारणा केली. त्यात फक्त १० जणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती इयन ब्राउनली या अधिकाऱ्याने दिली. भारतात अजूनही २४ हजार अमेरिकन नागरिक आहेत. करोना व्हायरसमुळे अमेरिकेत लाखो लोक बाधित असून हजारो नागरिक आपल्या प्राणास मुकले आहेत. अमेरिकेतून दररोज मृतांचा आकडा वाढत चालल्याच्या बातम्या येत आहेत.
Leave a comment