कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
शनिवार रोजी समर्थ सार्वजनिक वाचनालय कुं.पिंपळगांव येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.सोळंके एच.एन..हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री अवचार एम.एम.,श्री काजळे के.बी. हे उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जिवन कार्याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले.
Leave a comment