तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा ते भारडी जुन्या शिव पांदन स्त्याच्या लोक सहभागातून कामाचा शुभारंभ दि. 29रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र भाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महेंद्र पवार म्हणाले घनसावंगी मतदार संघाचे लोक प्रतिनिधी व नामदार राजेश टोपे यांनी शासनाच्या वतीने स्वतःच्या संकल्पनेतून मतदार संघातील शेतकर्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी व स्वतःचा पिकविलेला माल काढण्यासाठी शिव व पांदण रस्ते यांची कामे व्हावी या हेतूने टोपे यांनी गावागावातील शेतकर्यांनी लोकसहभागातून एकत्र येऊन कामे करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून यासाठी शासनाच्या वतीने पोकलेन व जेसीबी मशीन दिली जाणार असून शेतकर्यांनी डिझेल तेल टाकून शिव व पांदण रस्त्याची कामे पूर्ण करावी या खापर्देव्हीवरा ते भारडी रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी शेतकर्यांशी संवाद साधताना पवार यांनी सांगितले तसेच हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे या रस्त्याची नोंद करून,खडीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल यावेळी तहसीलदार नरेंद्र देशमुख पंचायत समिती सभापती भागवत रक्ताटे तसेच तलाठी संदीप नरोटे महसूलचे पांडुरंग गिरे रघुनाथ बारवकर श्रीरंग रोडे भीमराव रोडे सुनील कोरडे अर्जुन परदेशी प्रकाश परदेशी आधी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Leave a comment