बीड । वार्ताहर
कोरोनाचा धोका लक्षात घेता बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे. या आदेशाचे काही जणांकडून उल्लंघन केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गत दोन दिवसात (दि.10, दि.11) जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या कारवाईत एकुण 43 जणांवर कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडेकोट उपाययोजना केल्या गेल्या आहेत. जमावबंदी व संचारबंदी लागू आहे. मात्र काही जण या आदेशाचे उल्लंघन करतांना दिसत आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यात विविध ठाणे हद्दीत या आदेशाला न जुमानणार्या 811 आरोपींविरुध्द 298 गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि.10) जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेचे उल्लंघन करणार्या 15 जणांविरुध्द 9 गुन्हे दाखल झाले तर शनिवारी (दि.11) 28 जणांविरुध्द 8 गुन्हे दाखल झाले आहेत.
Leave a comment