गेवराई । वार्ताहर
रेशन वाटप करण्यासंदर्भात शुक्रवारी नगरपरिषद गेवराई येथे झालेल्या प्रत्येक विभागाच्या आढावा बैठकिमध्ये आमदार लक्ष्मण पवार यांनी तालुका पुरवठा अधिकारी भंडारी याना प्रत्येक रेशन दुकानासाठी तलाठी,ग्रामसेवक व शासकीय कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्या उपस्थितीतच राशन वितरित करा अशा सूचना दिल्या होत्या.त्या सुचनेच्या अनुषंगाने सज्याच्या ठिकाणी तलाठी व ग्रामसेवक तर इतर ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांच्या उपस्थितीतच रेशन वितरित करण्याच्या लेखी सूचना पुरवठा विभागाने राशन दुकानदाराला दिल्या आहेत.
आ.पवार म्हणाले, संपूर्ण देश कोरोना या महामारीमुळे परेशान आहे.संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही अश्या कठीण व अडचणीच्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून सामान्य माणसाला मोफत व माफक दराने रेशन उपलब्ध करून दिले जात आहे.हे रेशन प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणे प्रशासनाची व लोकप्रतिनिधी या नात्याने आमची जबाबदारी आहे. तालुक्यातील नागरिकांकडून वेळोवेळी रेशन वितरणाबाबत येत असलेल्या तक्रारी मुळे तालुका पुरवठा अधिकार्यांना राशन वितरित करताना प्रत्येक राशन दुकानावर तलाठी,ग्रामसेवक व शयासकीय कर्मचार्यांच्या नियुक्त्या करून त्यांच्या उपस्थितीतच रेशनवितरित करा अशा सूचना दिल्या. तसा आदेशही तहशीलदार गेवराई यांनी काढला असल्याचे मला पुरवठा अधिकारी यांनी कळवले आहे असे आमदार पवार म्हणाले.
Leave a comment