बीड । वार्ताहर
धान्य दुकानाबाबतची तक्रार केल्याच्या कारणावरुन पंडित तुपे व अन्य एकास मारहाण झाल्याची घटना पिंपळवाडीत तीन दिवसांपुर्वी घडली होती. यावरुन मारहाण करणार्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान आता पंडित तुपेंसह सहा जणांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शंकर शामराव तुपे (27, रा.पिंपळवाडी) यांनी तक्रार दिली. पंडित महिपती तुपे, कृष्णा मडके व त्यांच्या अन्य चार साथीदारांनी जून्या भांडणाची कुरापत काढून काठी व लोखंडी पाईपने मारहाण करत शिवीगाळ केली. यावरुन नेकनूर ठाण्यात सहा जणांवर शनिवारी (दि.11) गुन्हा दाखल झाला. पोह.बरकडे अधिक तपास करत आहेत.
Leave a comment