जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 511
बीड | वार्ताहर
जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज शनिवारी (दि.25) पहाटे दीड वाजता प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात 37 तर शनिवारी दुपारी 12 वाजता आलेल्या अहवालात 7 असे एकूण 44 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना बाधीत रुग्णांमध्ये बीड 21, परळी 11,अंबाजोगाई 7, गेवराई 4 आणि केज 1 अशा एकूण 44 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 511 झाली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थान येथील एक गार्ड यापूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तेथील काही कर्मचार्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. आजच्या रिपोर्टमध्ये पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानी कर्तव्य बजाणार्या त्या 15 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
बाधीत रुग्ण याप्रमाणे बीड : 8 वर्षीय महिला, 33 वर्षीय महिला ( दोघे रा. कटकटपुरा, राजुरीवेस), 40 वर्षीय पुरुष ( रा शिवाजी नगर) 40 वर्षीय महिला ( रा.माळीवेस) 70 वर्षीय पुरुष ( रा.धानोरा रोड) 02 वर्षीय पुरुष व 31 वर्षीय महिला (रा.सावतामाळी चौक) 52 वर्षीय पुरुष ( रा.स्वराज्य नगर) 47 वर्षीय पुरुष ( रा अक्सा कॉलनी , शहेनशाह नगर) 57 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला ( रा.कालिका नगर) 67 वर्षीय पुरुष ( रा विद्यानगर पुर्व ) 58 वर्षीय महिला व 60 वर्षीय पुरुष (रा.शाहेनशाह नगर नर्सरी रोड) 67 वर्षीय महिला (रा.अजिजपुरा ) 39 वर्षीय महिला (कबाड गल्ली) 52 वर्षीय पुरुष (सुर्या लॉन्स जवळ, शाहूनगर), 40 वर्षीय पुरुष (रहमतनगर), 30 वर्षीय महिला (आदित्य नगरी, व्यंकटेश शाळेजवळ), 32 वर्षीय महिला (धानोरा रोड), 65 वर्षीय पुरुष (कॅनरा बँक कॉलनी, धानोरा रोड) या 21 जणांचा बाधीत रुग्णात समावेश आहे.
परळी येथील पद्मावती कॉलनीतील 65 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला, माणिकनगर येथील 38 वर्षीय पुरुष, धर्मापुरी (ता.परळी) येथील 35 वर्षीय पुरुष, उपजिल्हा रुग्णालय निवास्थानी परिसर परळी येथील 31 वर्षीय पुरुष, सिरसाळा (ता.परळी) येथील 48 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय पुरुष, दैठणा (ता.परळी) येथील 22 वर्षीय पुरुष, हमालवाडी (ता.परळी) येथील 55 वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय परळी तालुक्यातील महिला (पत्ताबाबत खात्री करणे सुरु आहे), अंबाजोगाई येथील हाऊसींग सोसायटी 40 वर्षीय पुरुष,46 वर्षीय महिला, 80 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय महिला, 46 वर्षीय महिला, 11 वर्षीय पुरुष व केशवनगर येथील 55 वर्षीय पुरुष, गेवराई येथील सिद्धीविनायक कॉलनी, 37 वर्षीय पुरुष, मोटे गल्ली येथील 32 वर्षीय पुरुष, नवीन बस स्टॅण्ड जवळ रा. 60 वर्षीय पुरुप, मोमीनपुरा येथील 100 वर्षीय पुरुष आणि केज तालुक्यातील बनसारोळा येथील 1 वर्षीय मुलगा अशा एकुण जिल्ह्यातील 44 जणांचा कोरोनाबाधित रुग्णांमध्ये समावेश आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर घाबरु नका, मनोधैर्य खचू देवू नका
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आवश्यक साहित्य बरोबर घ्या
नगर परिषद, नगरपंचायत ग्रामपंचायतीमधून तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह आहात म्हणून तुम्हाला फोन येतो आणि घरातील वातावरण बदलून जाते. काय कराव सुचत नाही. घरातील अन्य सदस्य तर हबकलेलेच असतात. मग गोंधळून न जाता डोके शांत ठेवून रुग्णालयात दाखल होताना काय साहित्य घ्यायचे आहे याचा विचार करावा आणि ते साहित्य सोबत घ्यावे. अन्यथा नंतर हे साहित्य देण्यासाठी इतरांना धावपळ करावी लागते. तुमच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अर्ध्या तासातच तुमच्या गल्लीत यंत्रणा दाखल होते. फवारणी सुरु होते. पीपीई किट घातलेले कर्मचारी चौकशी सुरु करतात. गल्लीत नागरिक हे सर्व पाहत असतात. परंतु याच तणावात आपल्याला लागणार्या वस्तु आठवणीने रुग्णांच्या घरातील सदस्यांनी देण्याची गरज असते.
पॉझिटिव्ह रुग्णाने हे घ्यावे
ब्रश, पेस्ट, दंतमंजन, 10-12 दिवसांसाठी लागणारे कपडे, एखादे बेडशीट, चादर, काही औषधे सुरु असतील तर ती घ्यावीत, आंघोळ व कपडे धुण्याचे साबण, तेल, कंगवा, गरम पाण्यासाठी इलेक्ट्रिक कियला किंवा थर्मास, काही फळे, बिस्कीट, सॅनिटायझर, मास्कर आणि ग्लोव्हेज
रुग्णाच्या घरातील सदस्यांसाठी आवश्यक
संस्थात्मक अलगीकरणामध्ये किमान 8-10 दिवस राहावे लागणार आहे याची जाणीव ठेवून वरीलप्रमाणे आपले साहित्य घ्यावे, कारण त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तरी त्यांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये राहावे लागते 2-3 दिवसांनी अहवाल निगोटिव्ह आल्यानंतर स्थानिक प्रभाग समितीच्या पत्रानुसार हॉटेलध्येही राहाता येते. हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्यासाठी निगेटिव्ह अहवालाची प्रत व हॉटेल आरक्षित केल्याची पावती आवश्यक ठरते. घरी राहण्यासाठी निगेटिव्ह आल्याची प्रत व समितीच्या सचिवांच्या पत्राची गरज असते.
प्रशासनाने ही माहिती द्यावी
प्रशासनाकडून आलेल्या कर्मचार्यंनी शांतपणे रुग्ण आणि नातेवाईकांना काय बरोबर घ्यावे. किती दिवस रहावे लागेल याची थोडक्यात माहिती देण्याची गरज आहे. ही माहिती दिल्यास ते रुग्ण आणि नातेवाईकांसाठी सोयीचे होणार आहे.
आधार व रेशन कार्डच्या झेरॉक्स
संबंधितांनी आधारकार्ड व रेशनकार्डच्या झेरॉक्स सोबत घेण्याची गरज आहे. डिस्चार्ज देताना महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी याची गरज पडू शकते. मोबाईलमध्ये आधार आणि रेशनकार्ड असले तरी प्रिंट कुठे काढायची असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
Leave a comment