बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा दुकाने उघडण्याच्या वेळेत रविवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अंश:त बदल केला आहे.
जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, कृषी निविष्ठा, अवजारे, यंत्रे, शेतीसाठी लागणारे साहित्य इत्यादी बाबींचे घाऊक दुकानदार, वितरक यांची दुकाने आज दि.13 एप्रिल रोजी सकाळी 6 ते 10.30 वाजेपर्यंत बंद राहतील. इतरवेळी दि.8 एप्रिल 2020 च्या आदेशाप्रमाणे इतर जीवनावश्यक सेवांच्या घाऊक दुकानदार, वितरक यांच्याप्रमाणे ही दुकाने उघडतील. तसेच वरील बाबींची किरकोळ विक्रींची व कृषी यंत्रे, अवजारे दुरुस्ती करणारी दुकाने आज दि.13 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सकाळी 9.30 वाजेपर्यंत उघडी राहू शकतील. दि.14 एप्रिल पुढील कालावधीसाठी स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.
Leave a comment